मनाचा स्वामी - माणसांनी चुकीचा करून घेतलेला समज
- MarathiTechKatta
- Apr 17, 2023
- 3 min read
Updated: Apr 20, 2023

मनाचा स्वामी - माणसांनी चुकीचा करून घेतलेला समज .
स्वामी हा शब्द कानावर पडला कि आपल्या सारख्या सामान्य मनुष्याच्या डोक्यात काय येते कि , स्वामी म्हणजे प्रभुत्व ,एकाद्या गोष्टीचा मालक किंवा मालकी हक्क असलेला . आपण रोजच्या जीवनात कितीतरी वेळा हा शब्द सहजच वापरतो , "मी माझ्या मनाचा स्वामी आहे ." म्हणजे मी माझ्या मनाचा राजा आहे , बरोबर ना ? पण आपण कधी विचार केला आहे का कि मनाचा स्वामी म्हणजे नक्की काय ?
तसा पाहायला गेलात तर स्वामी म्हणजे राजा हा अर्थ बरोबर हि आहे पण मनाचा स्वामी हा शब्द दुहेरी अर्थी आहे. एक अर्थ म्हणजे मनाचा राजा आणि दुसरा अर्थ म्हणजे मनाचा गुलाम .तुम्ही म्हणाल हे कसा काय ? त्यासाठी आपण पुढील उदाहरण पाहू .
आजच युग इंटरनेटचा युग आहे म्हणजे सगळं कसा एका क्लिक मध्ये समोर हाजीर .एकाच क्लिक मध्ये पाहिजे ते बघा ,नको असेल ते स्किप करा , पाहिजे ते ऑर्डर करा किंवा रिटर्न करा . घरी बसल्या काहीही हाथ पाय ना हलवता हव्या असणाऱ्या गोष्टी दाराशी मिळवा . एवढच नाही तर स्वयंपाक घरात अन्नाचा एक हि कण नसेल तरी हि तुम्ही घरी पाहिजे ते जेवण करू शकता ते पण एक क्लिक वर . बरोबर ना ? "कसा ! ते आपल्याला सांगायची गरज आहे का ?". सांगायचं तात्पर्य येवडंच कि आजकाल माणसाला सगळं कसा इन्स्टंट हवं आहे . मनात विचार आला रे आला कि तो सत्यात लगेचच यावा अशी मनाची ओढ तयार होते आणि मग हवी असणारी गोष्ट पाहिजे त्या वेळेला नाही मिळाली कि मन बैचैन होत आणि मग नाराजी , उदासीनता , खूप काळ राहणार नैराश्य मनात घर करत आणि हे सगळं का होत तर आपल्याला वाटत आपल्या मनासारखं व्हावं ? एखादी गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी अशी वाटणारी भावना किंवा ती आपल्या मनासारखी कशी होईल हा विचार आणि ती गोष्ट हवी तशीच घडून आणणे म्हणजे मानाचं स्वामित्व किंवा मनाचा राजा . मी माझ्या मनात येईल तस वागतो , मनात येईल ते करतो , मला कोणाला विचारायची गरज नाही कारण मी माझ्या मनाचा राजा आहे . पण तुम्ही कधी विचार केला आहे का , कि जगविख्यात असणाऱ्या लोकांची मनाचा स्वामी याची काय व्याख्या आहे ? किंवा तुम्ही आपला इतिहासतील मोठ्या मोठ्या व्यक्तींची चरित्र जर पाहिलीत तर त्यातून तुम्हाला हे स्पष्ट दिसून येते कि , जो मनुष्य आपल्या मनावर स्वामित्व मिळवतो किंवा त्याला नियंत्रणात ठेवतो तो खरा मनाचा स्वामी होतो आणि तोच खरा मनाचा राजा , मनाचा गुलाम ठरतो . गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांना कोण ओळखत नाही . स्वामी विवेकानंद किंवा गौतम बुद्ध हि नावे शांतीच प्रतीक म्हणूनच घेतली जातात ,त्यांनी देखील जो मनावर नियंत्रण करतो , पूर्णपणे विचार करून गोष्टींचा पारदरखक अनुभव घेऊन निर्णय घेतो तोच खरा मनाचा स्वामी ठरतो असे सांगितले आहे .
मनाचा खरा स्वामी तोच जो मनावर नियंत्रण ठेवतो .
अस म्हणतात , आपल्या मनामध्ये येणाऱ्या विचारांमध्ये जग बदलण्याची ताकत असते , आपल्या मनात वर्तमानात चालू असणारे विचार आपले भविष्य ठरवत असतात , तर मग अश्या ह्या आपल्या मनात येणाऱ्या दिशाहीन विचारांना जरा दिशा देयाला काय हरकत आहे . मनात आलेल्या विचारांना सैरभैर इकडे तिकडे ना भटकू देता त्यांना एक चांगल्या भविष्य घडवणाऱ्या मार्गावर पाठवायला काय हरकत आहे .
आपण एखादी गोष्ट मनात आली कि ती लगेच करतो याचा विचार हि ना करता , कि ती बरोबर आहे कि चूक ? योग्य आहे कि अयोग्य ? त्याचा आपल्या आयुष्यावर किती प्रमाणात परिणाम होईल ,आणि अश्या बेजवाबदार वागण्याला आपण स्वछंदी जीवन मनवतो किंवा मनाचा स्वामी मनवतो .
We do mistakes, we repeat those mistakes and after some time we do not find those mistakes as mistakes.
- Maheshwari Kadam
मनाला स्वछंदी जगू द्यावं पण बंधनात राहून .

नदीचे पाणी एकसमान , एकासुरत एक दिशेने वाहत असते , त्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांचे , मोठया मोठ्या दगडांचे पर्वताचें किंवा मनाच्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचे हि परिणाम नदीवर नाहीत होत कारण तिची दिशा हि ठरलेली असते , तिला सागराला मिळायला जायचे आहे हे तिला माहित असते. त्याचप्रमाणे आपल्या मनातील विचारांना हि आपण एक दिशा आणि बरोबर असा मार्ग दिला कि आपल्याला क्षणिक अपनंदापेक्षा चिरकालीन सदाकाळ टिकणारा आनंद अनुभवायास मिळेल , सुखी ,शांत आणि समतोल आयुष्य जगायला मिळेल .आपल्या आयुष्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या अडथळ्यांवरती हि आपण विजय मिळवू शकतो जर आपण आपल्या स्वछंदी मनाचा राजा ना होता जबाबदार मनाचा स्वामी झाले तर .
Comentários